पुणे रेल्वे हॉस्पिटलच्या "कोरोना वॉरियर्स'चा सत्कार

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 30 November 2020

विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती रेणु शर्मा यांनी पुण्यातील विभागीय रेल्वे रुग्णालयाची पाहणी केली आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी नव्याने बांधलेल्या सभागृहाचे उद्‌घाटन केले.

पुणे : पुणे विभागात 25 जुलैपासून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रेल्वेच्या "कोरोना वॉरीयर्स'चा विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती रेणु शर्मा यांनी पुण्यातील विभागीय रेल्वे रुग्णालयाची पाहणी केली आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी नव्याने बांधलेल्या सभागृहाचे उद्‌घाटन केले.
 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शर्मा यांच्या हस्ते या विशेष कार्यक्रमात कोरोना योद्धा डॉक्‍टरांसह अनेक वैद्यकीय, आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र, ढाल देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक सहर्ष बाजपेयी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय आठवले यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ अभय कुमार मिश्रा यांनी केले.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती शर्मा यांनी कोरोना काळातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवा आणि कोरोना रूग्णांची जबाबदारीने काळजी घेतल्याबद्दल त्यांच्या सेवांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या,""ही एक आव्हानात्मक वेळ आहे जेव्हा प्रत्येकास या साथीच्या आजाराने ग्रस्त व्यक्तीपासून दूर रहायचे असते. पण याची पर्वा न करता आपण समाज आणि मानवतेसाठी मोठी सेवा केली आहे. आपणांस यासाठी नेहमीच लक्षात ठेवले जाईल. हे मानवतेचे उत्तम उदाहरण आहे.'' भाषणानंतर श्रीमती शर्मा यांनी कोरोना वॉरियर्स आणि आरोग्य सेवेतील सर्व कामगारांना त्यांच्या सेवांसाठी कौतुक केले. अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक सहर्ष बाजपेयी आणि मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय आठवले यांनीही मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी डॉ.अविनाश निकजे, डॉ. अभय कुमार मिश्रा, डॉ. नीति आहुजा, डॉ. रीना भार्गव, डॉ. नवीन यादव, डॉ. शीतल वाघमारे, सहाय्यक आरोग्य अधिकारी दिलीप गायकवाड, प्रोटोकॉल इन्स्पेक्‍टर मिलिंद वाघोलीकर आणि मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी व गृहरक्षक कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

पुण्यातील येरवडा, विश्रांतवाडी, वडगावशेरी, धानोरी भागात मिळणार पुरेसे पाणी कारण..

पुणे रेल्वे विभागाचे हे रुग्णालय 50 बेड असलेले एक रुग्णालय आहे जे दहा हजाराहून अधिक व सेवानिवृत्त पाच हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना स्वास्थ्य सेवा पुरविते. सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊनपासून रुग्णालयातील सर्व कर्मचारी या लाभार्थ्यांच्या गरजा भागविण्यासाठी चोवीस तास कार्यरत आहेत. आऊट डोर, इनडोर पेशंट, डायलिसिस आणि इमर्जन्सी सर्व्हिसची नियमित कामे पूर्ण क्षमतेने चालू आहेत.

इतर सरकारी आणि खासगी रेफरल रुग्णालयांमध्ये बेडच्या कमतरतेचा सामना करण्यासाठी रेल्वे रुग्णालयाने कोविड- 19 आयसोलेशन वॉर्ड सुरू केला. इस्पितळात पुरेशी ऑक्‍सिजन बेड पुरविली गेली आणि व व्हेंटिलेशन सुविधा देखील पुरविली. सौम्य, मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर देखील यशस्वीरित्या उपचार केले गेले. अशा प्रकारे वास्तवीक वैद्यकीय मदत पुरविल्याने, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय संभाव्य समस्यांपासून वाचू शकले. कोरोनामधील पहिल्या रूग्णांवर 25 जुलै रोजी उपचार सुरु झाले. या कोविड वॉर्डमध्ये ऑक्‍सिजन लाईन्स, ऑक्‍सिजन सिलिंडर आणि रूग्णांवर उपचार करण्यासाठी विविध मॉनिटर्स बसविण्यात आले आहेत.

मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'वर दुधाचा टँकर उलटला; वाहतूक विस्कळीत

डॉक्‍टरांच्या रिक्ततेमुळे, कोविड उपचारासाठी त्यांच्या भरतीसाठी बरेच प्रयत्न केले गेले परंतु पुरेसे डॉक्‍टर उपलब्ध झाले नाही. तथापि, साथीच्या काळात या काळात रुग्णालयात नर्सिंग स्टाफ, अटेंडंट्‌स आणि हाऊस किपिंग स्टाफ पर्याप्त प्रमाणात उपलब्ध होते. कोविडविरूद्ध सर्व रेल्वे डॉक्‍टर अविश्रांत या युद्धात कार्यरत आहेत आणि साथीचे रोग टाळण्यासाठी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करीत आहेत. सावधगिरी बाळगल्यामुळे सुदैवाने कोणीही रेल्वे डॉक्‍टर या आजाराला बळी पडले नाही. दुर्दैवाने, या आजारामुळे रुग्णालयात काम करणाऱ्या एका आरोग्य कर्मचाऱ्याने आपला जीव गमावला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Divisional Railway hospital felicitated doctors treating corona patients