
Police intervening to control a clash between two groups during the Diwali Padwa morning event at Sarasbaug, Pune.
esakal
Summary
हाणामारीचे कारण छोट्या धक्काबुक्कीवरून वाद निर्माण होणे हे सांगितले जात आहे.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाद मिटवला.
याआधी या कार्यक्रमावर हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध आणि धमकीवजा इशारे देण्यात आले होते.
पुण्यातील सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाला गालबोट लागल्याचा प्रकार समोर आला आहे. या कार्यक्रमादरम्यान दोन गटांत हाणामारी झाली.चार ते पाच जणांकडून एकमेकांना शिवीगाळ आणि मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या 28 वर्षांपासून पुण्यातील सारसबागेतील दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदाच्या वर्षी देखील हा कार्यक्रम आयोजित केला होता.