नेत्रविकारावर पुण्याच्या डॉक्‍टरने दिली नवी दृष्टी 

Pune doctor gives new perspective on ophthalmology
Pune doctor gives new perspective on ophthalmology

पुणे - केराटोकोनस या दृष्टिविकारावर संशोधन करून पुण्यातील नेत्रतज्ज्ञ डॉ. नताशा पहुजा डाडलानी यांनी या विकारावरील उपचाराची नवी दृष्टी जगाला दिली. याबद्दल नेदरलॅंड्‌सच्या मास्ट्रिक्‍ट विद्यापीठाने डॉ. नताशा यांना पीएच. डी. प्रदान केली असून, सर्वांत तरुण "डबल डॉक्‍टरेट' म्हणून त्यांचा गौरव होत आहे. 

केराटोकोनस हा एक दृष्टिदोष आहे. या विकारात नेत्रपटलाचा नैसर्गिक आकार बदलला जातो. त्यामुळे वस्तूंपासून परावर्तित होणारे प्रकाश किरण नेत्रपटलावर एकत्रित होत नाहीत. त्यातून हा दृष्टिदोष तयार होतो. त्याला केराटोकोनस हा नेत्रविकार म्हणतात. या विकाराची सुरुवात किशोरवयात होते. वयाच्या तिशीपर्यंत याचे निदान होऊ शकते. नेत्रपटालाची सविस्तर तपासणी केली नसल्याने किंवा "लॅसिक' शस्त्रक्रियेपूर्वी योग्यपद्धतीने न केलेल्या तपासण्यांमुळे आणि नेत्ररोगाच्या विश्‍लेषणामुळे हा आजार उद्‌भवण्याचा धोका असतो. त्याला प्रतिबंध करण्यासाठी विसाव्या वर्षादरम्यान नेत्रतपासणी आवश्‍यक ठरते. 

या पार्श्‍वभूमीवर केराटोकोनस आणि चष्म्याचा नंबर कमी करणाऱ्या शस्त्रक्रियेत देशातील पहिली पीएच. डी. मिळविणाऱ्या डॉ. नताशा यांच्या संशोधनाचे महत्त्व आहे. याबद्दल बोलताना डॉ. नताशा म्हणाल्या, ""केराटोकोनस हा दृष्टिदोष कशामुळे उद्‌भवतो, त्याचे अचूक निदान कसे करावे आणि त्याच्या प्रभावी उपचारांची नवी दृष्टी या संशोधनातून मिळाली आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com