Pune : डॉ. दादा गुजर माध्यमिक विद्यालयात संपादणूक सर्व्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : डॉ. दादा गुजर माध्यमिक विद्यालयात संपादणूक सर्व्हे

Pune : डॉ. दादा गुजर माध्यमिक विद्यालयात संपादणूक सर्व्हे

उंड्री (पुणे) ः महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या महंमदवाडी (तरवडेवस्ती) येथील डॉ. दादा गुजर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज (शुक्रवार, दि. १२ नोव्हेंबर २०२१) राष्ट्रीय संपादणूक सर्वे (इयत्ता दहावी) सकाळी साडेसात ते दुपारी तीन या वेळेत झाला.

नवी दिल्ली येथील केंद्रीय शिक्षण मंत्रालय व राष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण परिषद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व्हे राबविण्यात आला.

हेही वाचा: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' तारखेला पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

संस्थेचे सचिव अनिल गुजर, मुख्याध्यापक डी. एम. पाटील, पर्यवेक्षिका व्ही. आर. देवकाते यांनी मार्गदर्शन केले. या सर्व्हेअंतर्गत विषय शिक्षकांनी प्रश्नावली सोडविली. या सर्व्हेसाठी अयोजिता मुन्नालाल यांनी ऑब्झरवर, तर नितीन श्रीधर साळवे यांनी फिल्ड इन्वेस्टीगेटर म्हणून काम पाहिले. विद्यालयात दहावीतील २५२ विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थ्यांची निकषाद्वारे निवड करण्यात आली.

loading image
go to top