Pune News : पुण्यात वर्दळीच्या रस्त्यावर "ड्रंक अँड ड्राइव्ह"चा थरार; मद्यधुंद चालकाने आधी दुचाकीला धडक दिली अन् मग...

Pune Accident News : पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराजवळ मद्यधुंद कार चालकाने भररस्त्यावर अपघात घडवला.चालकाचे नाव अनिकेत रमाकांत सोनटक्के (वय २५, चाकण, धाराशिव) असे आहे.त्याने आधी एका दुचाकीस्वाराला धडक दिली, ज्यात तो किरकोळ जखमी झाला.
A damaged car near Balgandharva Chowk after a drunk driver crashed into a bike and divider; Deccan Police investigating the Pune drunk and drive case.

A damaged car near Balgandharva Chowk after a drunk driver crashed into a bike and divider; Deccan Police investigating the Pune drunk and drive case.

esakal

Updated on

Summary

  1. चालकाने कार दुभाजकावर चढवली, यात कारचे मोठे नुकसान झाले.

  2. पोलिसांनी त्याच्यावर "ड्रंक अँड ड्राईव्ह" प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

  3. तपासात समोर आले की त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नव्हता.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवल एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कार चालकाने मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून एका व्यक्तीला धडक दिली. यानंतर त्याने कार दुभाजकावर चढवली यात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. डेक्कन पोलिसांकडून कार चालकावर ड्रंक अ‍ॅड ड्राईव्हचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com