

"Pune Navratri 2025: Police enforce traffic changes, vehicles banned near key temples."
Sakal
पुणे : शहरातील वाढत्या अपघातांचा धोका लक्षात घेत वाहतूक शाखेकडून ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह मोहिमेत मद्य सेवन करून वाहन चालवणाऱ्या १७२ वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. मद्य सेवन करून वाहन चालविणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी शहर वाहतूक शाखेने २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विविध भागांत नाकाबंदी मोहीम राबवली. शहरातील ३० ठिकाणी नाकाबंदी पॉइंट उभारून वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांची तपासणी केली. या कारवाईत १७२ वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवताना आढळून आले.