

Wheel Detaches, Yet Car Driven at High Speed
Sakal
पुणे : लष्कर परिसरात कारचे चाक निखळल्यानंतरही मद्यधुंद चालकाकडून वाहन भरधाव चालवत असल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी या मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतले. कोरेगाव पार्क भागात रविवारी (ता. ३०) मद्यधुंद चालकाने पबमधील कर्मचाऱ्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता. तर हिंजवडी येथे सोमवारी (ता. १) टेम्पोच्या धडकेत तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याने शहर हादरले. शहरात भीषण अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी मद्यधुंद वाहनचालकांविरुद्ध ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह मोहीम उघडली आहे.