

pune drunk and drive car without tyre
esakal
पुण्यातील कल्याणीनगर भागातील ड्रंक अॅंड ड्राईव्हची घटना ताजी असतानाच आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कॅम्प परिसरात एका मद्यधुंद चालकाने प्रताप केला आहे. टायर निघालेली कार भरधाव वेगात चालवून अनेकांच्या जिविताला धका निर्माण केला. कल्याणीनगर ते रेल्वे स्टेशनपर्यंत सुमारे त्याने कार चालवली. मात्र एका तरुणाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.