Shalarth ID Scam Inquiry Prolonged

Shalarth ID Scam Inquiry Prolonged

Sakal

Pune News : शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी लांबणीवर; 'एसआयटी'ला मुदतवाढ मिळण्याची चिन्हे, 'या' कारणामुळे अहवाल प्रलंबित

Shalarth ID Scam Inquiry Prolonged : अपात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे नियमबाह्यरीत्या शालार्थ प्रणालीत समाविष्ट केल्याच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या विशेष चौकशी पथकाला (SIT) तीन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे, कारण चौकशी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.
Published on

पुणे : अपात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे नियमबाह्यरीत्या शालार्थ प्रणालीत समाविष्ट केल्याच्या प्रकारासह अन्य संबंधित गैरप्रकारांच्या चौकशीसाठी शिक्षण विभागाने ऑगस्टमध्ये ‘विशेष चौकशी पथक’ (एसआयटी) नेमले आहे. मात्र, या पथकामार्फत करण्यात येणारी चौकशी अद्यापही सुरू आहे. परिणामी, शालार्थ प्रणालीतील गैरव्यवहाराची चौकशी करून अहवाल सादरीकरणासाठी ‘एसआयटी’ला आणखी काही काळ लागणार आहे. त्यामुळे या पथकाला चौकशी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com