Pune Fraud : कोथरूडमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ४१ लाखांची फसवणूक
Citscape Ploars LLP fraud : पुण्यातील कोथरूडमध्ये दांपत्याने ज्येष्ठ नागरिकाची ४१ लाख रुपयांची फसवणूक केली. सिटस्केप प्लोअर्स एलएलपी कंपनीत भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक घेतली. पोलिसांनी तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : कंपनीत गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा देण्याच्या आमिषाने दांपत्याने एका ज्येष्ठाची ४१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात एका दांपत्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.