पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय उमेदवार अंतिम करण्याचे काम भाजपकडून सुरु आहे. त्यामध्ये उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी (ता. २६) जाहीर होण्याची शक्यता आहे. ही यादी किमान ८० उमेदवारांची असेल असे पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत काडीमोड घेतला आहे. तर शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेतर्फे भाजपला त्यांना किती जागा हव्या आहेत याचा प्रस्ताव दिला जाणार आहे.