

Pune Andekar gang election ticket controversy
Esakal
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीनं आयुष कोमकरची हत्या केली. या हत्याकांडानंतर दोन्ही टोळीतील सदस्य सध्या तुरुंगात आहेत. दरम्यान, आंदेकर तुरुंगातूनच निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. याविरोधात आता आयुष कोमकरची आई संजीवनी कोमकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आंदेकर कुटुंबाच्या राजकीय महत्त्वकांक्षेला जोरदार विरोध केलाय.