Pune News: पुण्यातील अतिक्रमणांचा दहशतवाद कधी संपणार? भाजपच्याच नगरसेवकांचे महापालिकेत आंदोलन

Encroachment Row Sparks Protest by BJP Corporators in Pune: पुण्यातील अतिक्रमणांवरून महापालिकेत खडाजंगी; भाजप नगरसेवकांनी थेट सभागृहात मांडले प्रतीकात्मक दुकान
Pune News BJP Corporators Protest Against Encroachments Mayor Manjusha Nagpure Warns Civic Officials Over Delayed Action

Pune News BJP Corporators Protest Against Encroachments Mayor Manjusha Nagpure Warns Civic Officials Over Delayed Action

esakal

Updated on: 

पुणे : देशातील नक्षलवाद संपला, दहशतवाद संपला; पण पुण्यातील गोखले रस्त्यावरील अतिक्रमणांचा दहशतवाद कधी संपणार? असा सवाल करीत भाजपच्याच नगरसेवकांनी आज महापालिकेच्या सभागृहात आंदोलन केले. महापौरांच्या आसनासमोर प्रतीकात्मक कपड्यांचे दुकान मांडून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. भाजपची महापालिकेत सत्ता असतानाही त्यांच्याच नगरसेवकांना आंदोलन करावे लागत असल्याने विरोधकांनी भाजपची खिल्ली उडविली. या आंदोलनाची दखल घेत महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला, तर आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमणांवर आजपासून कारवाई सुरू करण्याचे आश्वासन दिले.

Loading content, please wait...