Pune : वन्यप्राणी शिकार परवानगी संबंधी पर्यावरणवादी तज्ज्ञाचे चुकीचे वक्तव्य

शिकारबंदी चुकीचे असल्याचे नमूद करत शिकारीला परवानगी देण्याची मागणी केली
wildlife hunting permit
wildlife hunting permit

पुणे : वन्यप्राण्यांच्या शिकारीला परवानगी देण्यासंबंधी एका ज्येष्ठ पर्यावरणवादी तज्ज्ञाने केलेले वक्तव्य चुकीचे आहे. त्यांनी सरसकट शिकारबंदी चुकीचे असल्याचे नमूद करत शिकारीला परवानगी देण्याची मागणी करणारे वक्तव्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य चुकीचे असून या वक्त्याने गेल्या अनेक दशकांपासून चालू असलेल्या वन्यप्राणी संरक्षण न संवर्धन चळवळीच्या प्रयत्नांनाच धक्का पोचला आहे.

अनेक शिकाऱ्यांचे मनोबल वाढविणारे हे वक्तव्य अनाठायी आहे. या वक्तव्याचा वाइल्ड या संघटनेच्यावतीने तीव्र निषेध करण्यात येत असल्याचे या संघटनेचे अध्यक्ष शेखर नानजकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. पर्यावरण क्षेत्रातील मार्गदर्शक म्हणवून घेणाऱ्या या पर्यावरणवाद्यांनी त्यांचे वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

माणूस हाच पृथ्वीचा मालक, त्राता आणि पालक असल्याच्या भूमिकेत ज्येष्ठ पर्यावरणवादी दिसत आहेत. त्यामुळे त्यांना वन्यप्राण्यांचे जीवनमरण, त्यांची संख्यावाढ, त्यांचे संतुलन आदींची जबाबदारी ही माणसाचीच असल्याचे वाटू लागले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थच असा होत आहे. देशात संपूर्ण शिकारबंदी कायदा लागू असल्याने वन्यप्राण्यांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे. यासाठी काही वन्यप्राण्यांना मारण्याची परवानगी सरकारने द्यावी, असे या पर्यावरणवादी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण हे प्राणी कोण, कुठले, हे कोण ठरवणार, ठरल्याप्रमाणेच वन्यप्राणी मारले जातील, हे कोण बघणार, आदी सवालही नानजकर यांनी या उपस्थित केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com