

Pune EV Expo 2026
esakal
पुणे : फ्युचरेक्स ग्रुप ने इंडिया इंटरनेशनल ईवी शो, इंडिया इंटरनेशनल बैटरी शो आणि इंडिया इंटरनेशनल सोलर शो २०२६या एकत्रित प्रदर्शनांची घोषणा केली आहे. हे प्रदर्शन २ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.
ही तीन सह-आयोजित प्रदर्शने इलेक्ट्रिक मोबिलिटी, बॅटरी तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा आणि शाश्वत वाहतूक क्षेत्रासाठी भारतातील सर्वात मोठे एकात्मिक व्यासपीठ निर्माण करणार असून, स्वच्छ ऊर्जा मूल्यसाखळीतील सर्व घटकांना एकाच छताखाली आणणार आहेत.
यापूर्वीच्या सात यशस्वी आवृत्त्यांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या प्रदर्शनात १५० हून अधिक प्रदर्शक, १५,००० हून अधिक व्यावसायिक अभ्यागत, ५,००० हून अधिक डीलर्स व वितरक, शासकीय अधिकारी, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, फ्लीट ऑपरेटर्स, तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोन्मेषक तसेच भारत आणि परदेशातील उद्योग क्षेत्रातील मान्यवर सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
या प्रदर्शनामध्ये स्वच्छ मोबिलिटी आणि ऊर्जा क्षेत्रातील संपूर्ण परिसंस्थेचे दर्शन घडविण्यात येणार असून, त्यामध्ये पुढील प्रमुख विभागांचा समावेश असेल :
इलेक्ट्रिक दुचाकी, तीनचाकी, प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने आणि बसेस
EV घटक आणि ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान
बैटरी सेल्स, बॅटरी पॅक्स, बेटरी मनेजमेट सिस्टिम (BMS), बॅटरी उत्पादन उपकरणे, बॅटरी रिसायकलिंग, ऊर्जा साठवण प्रणाली आणि बॅटरी स्वैपिंग सोल्यूशन्स
EV चार्जिग इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्मार्ट चार्जिंग तंत्रज्ञान
सोलर PV, ऊर्जा साठवण, स्मार्ट ग्रिड्स आणि एकात्मिक सौरऊर्जेवर आधारित EV चार्जिंग सोल्यूशन्स
कनेक्टेड मोबिलिटी, ऑटोनॉमस तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), IOT, सॉफ्टवेअर आणि भविष्यकालीन मोबिलिटीमधील नवकल्पना
शासकीय धोरणांचे पाठबळ, देशांतर्गत उत्पादनातील गुंतवणूक, वाढते चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि नवीकरणीय ऊर्जेचा वाढता स्वीकार यामुळे भारत शाश्वत वाहतुकीकडे वेगाने वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर ही तीन प्रदर्शने नवकल्पना, सहकार्य, व्यावसायिक नेटवर्किंग, उत्पादनांचे लोकार्पण आणि ज्ञानविनिमयासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहेत.
या प्रदर्शनाबाबत बोलताना फ्युचरएक्स ट्रेड फेअर अॅड इव्हेंट्स प्रा. लि. यांच्या संचालिका निधी शर्मा म्हणाल्या, इंडिया इंटरनेशनल ईवी शो ची आठवी आवृत्ती, इंडिया इंटरनेशनल बैटरी शो आणि इंडिया इंटरनेशनल सोलर शो यांच्यासह भारताच्या स्वच्छ मोबिलिटी आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ही तीन सह-आयोजित प्रदर्शने देशातील सर्वात प्रभावी उद्योग व्यासपीठांपैकी एक म्हणून विकसित झाली असून, उत्पादक, तंत्रज्ञान पुरवठादार, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक आणि नवोन्मेषकांना एकाच छताखाली आणतात.