

Fake IPS Officer Detained at Pune Commissionerate Sagar Waghmode Under Investigation
Esakal
पुणे पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेटून मी आयपीएस आहे असं सांगणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा प्रकार समोर आला होता. आता या प्रकरणात अपडेट्स समोर येत आहेत. सागर वाघमोडे असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. तो विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर सदीप भाजीभाकरे यांना भेटला होता. तेव्हा त्यानं परिमंडल १चे कृषिकेश रावले माझे बॅचमेट आहेत असं सांगितलं होतं. नेमकं त्याचवेळी रावले तिथं आल्यानं बिंग फुटलं होतं.