पत्नीचा पगार १ लाख, तरी महिना ४० हजार पोटगी द्यावी लागणार; पुणे कोर्टाचा पतीला दणका

Wife Earns Rs 1 Lakh Yet Court Grants Monthly Alimony पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाने पतीने पत्नीला ४० हजार रुपये दरमहा पोटगी द्यावी असे आदेश दिलेत. पत्नीला १ लाख पगार असला तरी पोटगीचा अधिकार असल्याचं नमूद केलंय.
court

Court

Esakal

Updated on

पत्नी उच्चशिक्षित आणि १ लाख रुपयापेक्षा जास्त पगार आहे म्हणून पतीला त्याच्या जबाबदाऱ्या झटकता येणार नाहीत असं म्हणत कोर्टाने पत्नी आणि मुलांना खर्चासाठी पतीने दरमहा ४० हजार रुपये द्यावे असे आदेश दिलेत. पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाने एका घटस्फोट प्रकरणात हा निर्णय दिलाय. पतीने नोकरी गेल्याचं खोटं सांगितलं आणि साडेतीन लाख रुपये पगार असूनही तो लपवला असल्याचा आरोप पत्नीने केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com