

Child Maintenance Case in Pune Why Family Court Rejected Monthly Ten Thousand Rupees Plea After Divorce Settlement
sakal
पुणे : घटस्फोटाच्या वेळी सात लाख रुपयांची कायमस्वरूपी पोटगी स्वीकारून मुलाच्या संगोपनासह शिक्षण व वैद्यकीय खर्चाची जबाबदारी घेतल्यानंतर पुन्हा मुलासाठी स्वतंत्र पोटगीची मागणी करणारा दावा कौटुंबिक न्यायालयाने फेटाळला. पूर्वीच्या पस्थितीत कोणताही बदल झालेला नसताना तसेच आधीच्या तडजोडीची महत्त्वाची माहिती लपवून याचिका दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने ती ग्राह्य धरता येणार नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.