पुणे : विद्युत रोहित्र बंद केल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्युत रोहित्र बंद केल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये

पुणे : विद्युत रोहित्र बंद केल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये

sakal_logo
By
राजकुमार थोरात - सकाळ वृत्तसेवा

पुणे (वालचंदनगर) : साहेब पिकं पाण्याला आलं आहे... डी.पी. बंद करु नका..अशी विनंती सध्या इंदापूर तालुक्यातील शेतकरी करु लागले आहेत. तर काही ठिकाणी शेतकरी व शेतकरी संघटना, सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून विद्युत रोहित्र न जोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील भवानीनगर ते खोरोची पर्यंतची विद्युत पंपाची बिले थकल्यामुळे महावितरण ने विद्युत रोहित्र बंद करण्याचा सपाटा लावला असल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये आला आहे. पश्‍चिम भागातील अनेक गावातील विद्युत रोहित्र बंद झाली आहेत. सध्या शेतकऱ्यांची उस व इतर पिके पाण्याला आली आहेत. तसेच गहू व मका पिकांची पेरणी सुरु आहे.विद्युत रोहित्र बंद केल्यामुळे विद्युत पंप बंद झाले असून शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहे. सध्या कालव्याचे ही पाणी बंद असल्यामुळे विहिरीतील पाणी देण्याची शेतकऱ्यांची धडपत आहे. पिकांना वेळेत पाणी न मिळाल्यास पिके सुकण्याचा धोका आहेत. तसेच नुकतीच पेरणी केलेली गहू,ज्वारी,कडवळ व मकेच्या पिकांना पाण्याची गरज आहे. विद्युत रोहित्र बंद केल्यामुळे गव्हाचे पेरण्या रखडल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहेत.लाकडी मध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येवून महावितरणच्या धोरणाचा निषेध करुन तातडीने विद्युत रोहित्र सुरु करण्याची मागणी केली. यावेळी दत्तात्रेय वणवे,काशिनाथ वणवे, महेश वणवे,तात्या खाडे, संजय ढोले, सदाशिव ढोले, राम वणवे, पांडुरंग वणवे उपस्थित होते.

यांसदर्भात निरवांगी येथील शेतकरी बाळासाहेब गायकवाड व खोरोची मधील शेतकरी दादासाहेब भाळे यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्यातील नीरा नदी काठचे शेतकरी विद्युत पंपाच्या केबल चोरीमुळे त्रस्त व अडचणीमध्ये आले आहेत.यामध्ये महावितरण ने विद्युत रोहित्र बंद करण्याचा सपाटा लावला असून शेतकऱ्यांच्या पुढील अडचणी वाढल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने महावितरण ने विद्युत रोहित्र बंद न करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

हेही वाचा: सत्ता दिल्यास प्रत्येक महिलेला महिन्याकाठी हजार रुपये: केजरीवाल

यासंदर्भात महावितरणे वालचंदनगर उपविभागाचे महावितरण चे अधिकारी मोहन सुळ यांनी सांगितले की, वालचंदनगर उपविभागामध्ये १४० कोटी पेक्षा जास्त रक्कम थकीत आहे. शेतकऱ्यांसाठी सध्या कृषी धोरणानूसार सवलत सुरु असून शेतकऱ्यांनी एकूण बिलाच्या ६५ टक्के रक्कम भरुन महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

loading image
go to top