Pune FDA Action: पुण्यात एफडीएचा मिठाई विक्रेत्यांना दणका! कोंढवा, आळंदीतून १ हजार ४९१ किलो मिठाई जप्त करून नष्ट

Pune FDA Destroys 1491 Kg of Sweets Ahead of Diwali: २ लाख ९४ हजारांची मिठाई जप्त करून नष्ट; पुण्यातील दोन मिठाई विक्रेत्यांवर एफडीएचा बडगा
Diwali Sweet Alert in Pune FDA Destroys 1491 Kg of Ladoo Boondi and Barfi After Inspections at Two Sweet Shops

Diwali Sweet Alert in Pune FDA Destroys 1491 Kg of Ladoo Boondi and Barfi After Inspections at Two Sweet Shops

esakal

Updated on: 

पुणे: दिवाळी सणाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे. एफडीएने शहर व जिल्ह्यात दोन ठिकाणी कारवाई करत कोंढवा बुद्रुक येथील गायत्री लाडू भांडारमधून १ हजार १८८ किलो मोतीचूर लाडू आणि बुंदी, तर आळंदी येथील आर. बिकानेर मिठाई केंद्रातून ३०३ किलो बर्फीचा साठा जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला. दोन्ही कारवायांमध्ये एकूण १ हजार ४९१ किलो मिठाई नष्ट करण्यात आली असून, त्याची अंदाजे किंमत २ लाख ९४ हजार ९०० रुपये आहे.

Loading content, please wait...