Pune Festival 2023 : पुणे फेस्टिव्हलच्या मेजवानीस प्रारंभ

सनईवादन, कलात्मक योगासनांचे सादरीकरण
pune fastival
pune fastival sakal

पुणे - कर्णमधुर सनईवादन... ४० व्यक्तींच्या पथकाचे एकत्रित शंखवादन... ‘कलात्मक योगासनां’ची चित्तथरारक प्रात्याक्षिके... नवरसांचा आविष्कार करणारी ‘सीता’ ही नृत्यनाटिका... लावण्यांची अदाकारी... रोमांचित करणारी देशभक्तिपर गीते, अशी भरगच्च सांस्कृतिक मेजवानी रसिकांनी शुक्रवारी अनुभवली. निमित्त होते, ३५व्या पुणे फेस्टिव्हलच्या दिमाखदार उद्‍घाटन सोहळ्याचे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते फेस्टिव्हलचे उद्‍घाटन झाले. याप्रसंगी फेस्टिव्हलच्या पेट्रन आणि ज्येष्ठ अभिनेत्री व खासदार हेमामालिनी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रजनी पाटील, श्रीरंग बारणे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार रवींद्र धंगेकर, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार रमेश बागवे, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार, पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कलमाडी, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘‘कलमाडी यांच्याकडे मोठे व्हिजन आहे. त्यातून हा महोत्सव उभा राहिला.’’

पटोले म्हणाले, ‘‘पुणे फेस्टिव्हलबाबत मला उत्सुकता होतीच. गतवर्षी आमंत्रण होते, पण काही कारणांमुळे येऊ शकलो नाही. मात्र इथून पुढे दरवर्षी मी या कार्यक्रमाला येईन.’’

या वेळी ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संजय घोडावत ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत यांना ‘पुणे फेस्टिव्हल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

pune fastival
Pune Festival 2023 : दिमाखदार सोहळ्याने पुणे फेस्टिव्हलचे उद्‍घाटन

ड्रीम गर्ल’ला मानवंदना

हेमामालिनी स्थापनेपासून दरवर्षी फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहेत. या योगदानाबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्यावर चित्रित झालेल्या चित्रपट गीतांवर आधारित ‘गोल्डन एरा ऑफ ड्रीम गर्ल’ हा खास नृत्याविष्कार सादर झाला. यानंतर मंचावर आलेल्या हेमामालिनी यांना रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना दिली.

pune fastival
Mumbai News : 'सिंघम' सारखी झटपट न्याय देणारी प्रतिमा पोलिसासाठी धोकादायक - न्यायाधीश पटेल

‘फेस्टिव्हल’साठी पर्यटन खाते

महाजन म्हणाले की, ‘‘मला अनेक वर्षांपासून पुणे फेस्टिव्हलला यायचे होते. आमंत्रण कधी येईल, याची मी वाट पाहत होतो. शेवटी मला देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पर्यटन मंत्री होणे हाच पर्याय आहे. त्यासाठी त्यांनी क्रीडा खाते काढून घेत मला पर्यटन खाते दिले. त्यामुळे मी येऊ शकलो.’’ त्यांनी हे गंमतशीर पद्धतीने सांगताच सभागृहात हशा उसळला.

पुण्याचे ब्रँडिंग व्हावे आणि येथील स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून पुणे फेस्टिव्हलची सुरवात केली. सलग

३५ वर्षे सुरू असलेला हा फेस्टिव्हल आता पुण्याचे सांस्कृतिक वैभव बनला आहे. यापासून प्रेरणा घेऊन देशात अनेक सांस्कृतिक महोत्सव सुरू झाले, ही आनंदाची बाब आहे.

सुरेश कलमाडी, पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक- अध्यक्ष

pune fastival
Solapur News : रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com