पुणे
Pune Fire: मंतरवाडीमध्ये रंगाच्या गोदामाला भीषण आग, वाचा पुढे काय घडलं?
Latest Pune News: गोदामाचे शटर जेसीबीच्या साह्याने तोडून आग वीजवण्यात आली.
अभिजीत कुचेकर
रंगाच्या गोदामाला आग लागण्याची घटना उरुळी देवाची मधील मंतरवाडी येथे मंगळवारी पहाटे घडली.यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
काळेपडळ अग्निशामक दलाचे फायरमन सचिन आव्हाळे यांनी दिलेल्या माहिती नुसार,पहाटे दोन वाजून पंधरा मी. येथील मंतरवाडी कात्रज बाह्य मार्गावरील मे.निपकॉन पेंट प्रो ली कंपनीला आग लागली असल्याचा फोन आला. कर्मचार्यानी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळ्वण्याच्ये प्रयत्न सुरु केले.