Pune Fire Incident

Major Fire Incident Reported in Yerwada Pune

Esakal

पुण्यात ६० गाड्यांना भीषण आग; ४० दुचाकी आणि २० चारचाकी गाड्या जळून खाक

Pune Fire News : पुण्यातील येरवड्यात भूमी अभिलेख कार्यालयाच्या परिसरात एका मोकळ्या मैदानात लावलेल्या ६० गाड्या जळून खाक झाल्या आहेत. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास आगीची घटना घडली.
Published on

Pune Fire Incident: पुण्यातील येरवडा परिसरात ६० गाड्या जळून खाक झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. येरवडा परिसरात एका मोकळ्या मैदानात या गाड्या लावण्यात आल्या होत्या. जळून खाक झालेल्या गाड्यांमध्ये ४० दुचाकी आणि २० चार चाकी गाड्या असल्याचं सांगण्यात येतंय. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही आगीची घटना घडली. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहेत. आगीच्या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट हवेत पसरले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com