जळालेल्या घराची राखण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पुणे - दिवसाबरोबरच रात्रीच्या काळोखात शेकोटी करून, अनेक नागरिक आपल्या जळालेल्या घराच्या जागेवरच रात्र काढत आहेत. लहान मुलांना महापालिकेच्या शाळेत झोपवून कुटुंबातील एक व्यक्ती रात्रभर उद्‌ध्वस्त झालेल्या घरापुढे, जळालेल्या पत्र्यावर, कोळसा बाजूला सारून तेथेच झोपत आहेत.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

घरे पुन्हा उभी राहण्यासाठी किती दिवस लागतील माहीत नाही. तसेच शाळेतील निवारा कायमस्वरुपीचा नाही, त्यामुळे कधी ना कधी येथे यावेच लागेल, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

आंबेडकर शाळेत राहत असणाऱ्या अलका शेलार म्हणाल्या, ‘‘गेली तीन दिवस आम्ही शाळेत राहत आहोत. आमच्याकडे प्रशासनाचे कोणीही आलेले नाही. तसेच जळालेल्या घरातील वस्तू चोरीला जात असल्याने एकाला तेथे थांबावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकर निर्णय घेऊन आमची सोय करावी.’’

अफवांवर विश्‍वास ठेवू नका!
दिवसाबरोबरच रात्रीच्या वेळी पोलिस येथे गस्तीवर आहेत. जळालेल्या घरांमध्ये चोरी झाली आहे, आणखी आग लागली, बाकीच्या झोपड्या जळत आहेत, अशा अनेक अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, पोलिसांकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून वारंवार ध्वनिक्षेपकावर अशा अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

Web Title: Pune Fire at Patil Estate slums Do not believe in rumors