firing on friend
firing on friend

पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून केला मित्रावर गोळीबार

पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एकाने आपल्या मित्रावर छऱ्याच्या बंदुकीतुन गोळीबार केला. या घटनेत दूसरा मित्र गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना वडगाव धायरी परिसरात बुधवारी (ता.13) रात्री अकरा वाजण्याच्या सुमार घडली.

रोनित देविदास राठोड (वय 25, रा. दळवीनगर, नांदेडफाटा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भरत वाघ (वय 27, रा. दळवीनगर, नांदेड फाटा) याला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोनित व भरत हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्यात दोन वर्षापूर्वी काही कारणामुळे भांडणे झाली होती. त्याचा राग भरतच्या मनात होता. दरम्यान बुधवारी रात्री पावणे अकरा वाजता भरत त्याच्या एका साथीदारासमवेत रोनितकडे गेला. त्यावेळी त्याने पुन्हा एकदा जुन्या भांडणाचे कारण काढत रोनितवर छऱ्याच्या बंदुकीतून गोळी झाडली. गोळी रोनितच्या पोटात गेल्याने त्याच्या पत्नीने त्यास त्वरित रुग्णालयात हलविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com