Pune Flat Rate : पुणे : पेठांपेक्षा उपनगरातील सदनिकांना जादा भाव

गेल्या वर्षभरात पेठांच्या परिसरात सदनिकांच्या खरेदी-विक्रीत रेडी-रेकनरमधील (वार्षिक बाजादर) दरांपेक्षा १० ते १६ टक्के कमी दराने व्यवहार होत आहेत.
Flats in Pune
Flats in PuneSakal
Summary

गेल्या वर्षभरात पेठांच्या परिसरात सदनिकांच्या खरेदी-विक्रीत रेडी-रेकनरमधील (वार्षिक बाजादर) दरांपेक्षा १० ते १६ टक्के कमी दराने व्यवहार होत आहेत.

पुणे - गेल्या वर्षभरात पेठांच्या परिसरात सदनिकांच्या खरेदी-विक्रीत रेडी-रेकनरमधील (वार्षिक बाजादर) दरांपेक्षा १० ते १६ टक्के कमी दराने व्यवहार होत आहेत. या उलट उपनगरांमध्ये रेडी-रेकनरमधील सदनिकांच्या दरापेक्षा १० ते १५ टक्के जादा दराने व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले. संपूर्ण पुणे शहरात रेडी-रेकरनमधील दरापेक्षा सरासरी ६.४९ टक्के दराने खरेदी-विक्री होत आहे, तर पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात रेडी-रेकनरमधील दरापेक्षा ९ ते १२ टक्के दराने सदनिकांची विक्री होण्याचे प्रमाण आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने २०२३-२४ साठी रेडी-रेकनरचे नवे दर निश्‍चित करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान खरेदी-विक्री व्यवहारांच्या अभ्यास नोंदणी विभागाने केली. त्यासाठी ‘एनआयसी’कडून व्यवहारांची माहिती जमा करत त्याआधारे रेडी-रेकनरमधील दरापेक्षा पुणे शहरात, ग्रामीण भागात आणि नगरपालिका हद्दीत जादा दराने व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पुढील वर्षीच्या रेडी-रेकनरमध्ये (२०२३-२४) नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने वाढ प्रस्तावित केली आहे.

हवेली, मुळशीत वाढीव दराने व्यवहार

हवेली आणि मुळशी तालुक्‍यातील शहरालगतच्या गावांत रेडी-रेकनरमधील दरापेक्षा १० ते १४ टक्के वाढीव दराने व्यवहार होत आहेत. मात्र इंदापूर व दौंड तालुक्‍यातील हे प्रमाण २ ते ४ टक्के असल्याचे आढळून आले. आळंदी नगरपालिका हद्दीत मात्र हे प्रमाण जास्त असून, तेथे सरासरी २३.५० टक्के जादा दराने व्यवहार झाले आहेत, तर तळेगाव दाभाडे या नगरपालिका हद्दीत २३ टक्के इतक्‍या जादा दराने व्यवहारांच्या नोंदी झाल्या.

...तर एप्रिलपासून दर लागू

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पुणे शहराच्या रेडी-रेकनर दरात सरासरी ६ ते १९ टक्के वाढ प्रस्तावित केली आहे, तर पिंपरी-चिंचवड शहरात ८ ते १० टक्के आणि ग्रामीण भागात १५ ते १६ टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. या दरवाढीला राज्य शासनाकडून मान्यता मिळाली तर येत्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच एक एप्रिलपासून हे दर लागू होणार आहेत.

पेठांमध्ये कमी दराने व्यवहाराची कारणे...

  • अरुंद रस्ते, वाहतुकीची कोंडी

  • दाटीवाटीचे क्षेत्र, सुविधांची वाणवा

  • अपुरी पार्किंग व्यवस्था

  • पेठांपेक्षा उपनगराकडे वाढता कल

मी सदाशिव पेठेत गेली १५ वर्षे राहत आहे. माझी नोकरी येथे असल्याने मी फ्लॅट घेतला. मात्र पेठांमध्ये सध्या पार्किंग, वाहतूक कोंडीचा त्रास वाढल्याने मागच्या महिन्यात मी धायरीत शिफ्ट झालो. पेठेतील फ्लॅट विकून मी आता या भागात फ्लॅट घेतला आहे. पेठांच्या तुलनेत येथे तशा समस्या भेडसावत नाहीत.

- तुकाराम राणे, नागरिक

पूर्वी सिंहगड रस्त्यावर राहत होतो. या रस्त्यावर उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे येण्या-जाण्यासाठी लागणारा वेळ, पेट्रोलवर होणारा खर्च अशा सर्वाच गोष्टींचा विचार करून मी आता पेठांमध्ये राहवयास आलो आहे. कायमस्वरूपी धायरीमधून सदाशिव पेठेत स्थलांतर केले आहे.

- अमर सातपुते, नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com