Pune Flood Alert: पुण्यात धोक्याची घंटा! एकतानगरमध्ये ४० कुटुंबांतील १०० नागरिक स्थलांतरित; मुठा नदीतील पातळीत वाढ झाल्याने पाणी घुसले

Khadakwasla Release Floods Ektanagar in Pune: खडकवासला धरणातून वाढलेल्या विसर्गामुळे मुठा नदीला पूर; एकतानगर परिसरात पाणी घुसताच महापालिकेचे तातडीचे बचावकार्य, ४० कुटुंबांतील १०० नागरिक सुरक्षितस्थळी हलवले.
Khadakwasla Dam Water Release Triggers Flood Alert in Pune 40 Families Evacuated from Ektanagar Safely

Khadakwasla Dam Water Release Triggers Flood Alert in Pune 40 Families Evacuated from Ektanagar Safely

esakal

Updated on

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठा विसर्ग सुरू केल्याने एकतानगर परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने तातडीने बचावकार्य राबविले. जलपूजन, शारदा, द्वारका आणि आनंद पार्क या सोसायट्यांमधील सुमारे ४० कुटुंबांतील सुमारे १०० नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. या नागरिकांची जवळच्या बॅडमिंटन हॉलमधील निवारा केंद्रात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com