राजीव गांधी प्राणीसंग्रहालय बंद
राजीव गांधी प्राणीसंग्रहालय बंदSAKAL

कात्रज प्राणीसंग्रहालय बंद; पण खास व्यक्तींना आहे परवानगी

प्रशासनांकड़ून सामान्यांना एक न्याय तर व्हिआयपी लोकांना एक न्याय दिला जात आहे

कात्रज: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४मार्च २०२०ला कात्रजमधील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय बंद करण्यात आले. त्यानंतर दोन वर्षाचा कालावधी उलटत आला तरी प्रशासनाने प्राणी संग्रहालय चालू करण्याचा निर्णय घेतलेला नसून पर्यटकांकडून प्राणी संग्रहालय चालू करण्याची मागणी होत आहे. मात्र, अशात काही खास लोकांसाठी प्राणी संग्रहालयांकडून पायघड्या टाकल्या जात असल्याचे समोर आले आहे. प्रशासनांकड़ून सामान्यांना एक न्याय तर व्हिआयपी लोकांना एक न्याय दिला जात आहे. नियमांना फाट्यावर मारत अशा लोकांना प्राणी संग्रहालयात परवानगी दिली जात असल्याचे समोर आले आहे.

 राजीव गांधी प्राणीसंग्रहालय बंद
Pune Metro Job: इंजिनिअर्ससाठी मेगा भरती, २१ मार्चपर्यंत करा अर्ज

कोरोना काळापूर्वी साधारणतः दिवसाला अंदाजे ४ ते ५ हजार पर्यटक प्राणीसंग्रहालयाला भेट देत होते. कोरोनानंतर कोणालाही प्राणी संग्रहालयात जाण्याची परवानगी दिली जात नसताना व्हिआयपी लोकांना कशाच्या आधारावर परवानगी दिली जाते, असा प्रश्न सामान्य पर्यटकांमधून उपस्थित केला जात आहे. प्राणी संग्रहालय १ डिसेंबर रोजी पुन्हा चालू करण्याचा प्रस्ताव संग्रहालय प्रशासनांकडून महापालिकेला देण्यात आला होता. मात्र, तो प्रस्तावही ओमॅक्रॉन व्हेरिएंटच्या धर्तीवर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तालयांकडून फेटाळण्यात आला होता. मंदिरे, हॉटेल, उद्याने खुली झाली आहेत. मात्र, प्राणीसंग्रहालयाला परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत असून प्राणीसंग्रहालय चालू करण्याची मागणी जोर धरत असताना प्राणी संग्रहालय चालू करण्यात येत नाही. तर दुसरीकडे मात्र, व्हिआयपी लोकांना परवानगी दिली जात असल्याने प्रशासनाच्या कारभारांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

प्रतिक्रिया

प्राणी संग्रहालय लवकरच चालू होणार आहे. प्राणी संग्रहालयात नेहमीच पाहणी करण्यांसाठी किंवा कार्यालयीन कामकाजासाठी मान्यवरांची ये-जा होत असते. मात्र, यावेळी अनावश्यक कोणाला पर्यटनांसाठी परवानगी दिली असल्यास त्याची तपासणी करण्यात येईल. - राजकुमार जाधव, संचालक राजीव गांधी प्राणी संग्रहालय

संग्रहालयाच्या बाहेर लावण्यात आलेला 'बंद'चा फलक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com