पुणे : खडक पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fraud case

पुणे : खडक पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे: सदनिका व जमीन विक्री करण्याचा बहाणा करुन तिघांनी एका ज्येष्ठ नागरीकाची तब्बल 34 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बापू भिकाजी भुजबळ, ज्ञानेश्वर बापू भुजबळ (दोघेही रा. वारजे) यांच्यासह एका महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुमारदत्त ललित मोहन जोशी (वय 62, रा.सदाशिव पेठ) यांनी फिर्याद नोंदवली आहे. फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. फिर्यादी यांची 1998 मध्ये एका मित्रामार्फत बापू भुजबळ यांची ओळख झाली होती. त्यातुन फिर्यादी व शिंदे यांच्यात वेळोवेळी पैशांचे व्यवहार सुरु होते. भुजबळ यांनी त्यांची वडीलोपार्जीत जमीन, त्यांची पत्नी, मावशी व मेव्हणीच्या जमीनीचे कुलमुखत्यार असल्याचे सांगून न्यायालयाच्या कामकाजासाठी फिर्यादीकडून वेळोवेळी पैसे घेतले होते.

दरम्यान, फिर्यादीच्या कोंढवा येथील फ्लॅटची जादा दराने विक्री करण्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेऊन देतो, त्यासाठी माझ्या वडीलांच्या नावावर 15 लाख रुपये भरा, कर्ज मंजुर झाल्यावर परत करतो, असे सांगून बापू भुजबळ यांचा मुलगा ज्ञानेश्‍वर भुजबळ याने फिर्यादीकडून 15 लाख रुपये घेतले. तसेच बापू भुजबळ यांनीही फिर्यादीकडून वेळोवेळी 18 लाख 70 हजार रुपये घेतले होते. हे पैसे वेळेत न दिल्यास गावाकडील 62 गुंठे जमीन किंवा शुक्रवार पेठेतील फ्लॅट विकून पैसे देतो असे त्यांनी फिर्यादीस सांगितले. दरम्यान, सप्टेंबर 2020 मध्ये बापू भुजबळ यांचे निधन झाले. त्यानंतर फिर्यादीने ज्ञानेश्‍वर भुजबळ, त्यांच्या आईकडे पैसे देण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ करुन फिर्यादीची 33 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणक खडक पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.