esakal | पुणे: जपानी कंपनीचे कामकाज पाहण्याच्या आमिषाने फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूक

पुणे: जपानी कंपनीचे कामकाज पाहण्याच्या आमिषाने फसवणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: जपानच्या कंपनीला भारतात मिनरल खरेदीसाठी ऑफिस सुरू करायचे असून, कंपनीचे भारतातील कामकाज तुम्ही पहा, असे आमिष दाखवत माल खरेदीसह इतर कारणांसाठी २८ लाख रुपये बँक खात्यावर घेऊन एकाची फसवणूक केली.

हेही वाचा: पुणे : मिळकत वाटप नियमावलीत होणार सुधारणा

याप्रकरणी माधव सोपान ढमाले (रा. महेशनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डॉ. तोइची तकिनो या झिंग सोशल मीडिया ॲपवरील प्रोफाईलधारक, मार्क डॉनल्ड ब्रिटन, महिला आरोपी, एचडीएफसी बँकेचा खातेधारक, पंजाब नॅशनल बँकेचा खातेधारक अरुणकुमार यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आरोपीने झिंग सोशल मीडियावरून फिर्यादीला मेसेज पाठवला.

ओनो फार्मासिटिकल्स कंपनी लि. ओसाका, जपानचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, डिस्कव्हरी अँड रिसर्च असल्याचे आरोपीने फिर्यादीला सांगितले. त्यांची हेल्थ टेक्नॉलॉजी कंपनी असून, त्या कंपनीला भारतात मिनरल खरेदीसाठी ऑफिस सुरू करायचे आहे, तुम्ही आमच्या कंपनीसाठी भारतातील कामकाज पाहण्यासाठी इच्छुक असाल, तर आम्हाला कळवा, असे आरोपीने फिर्यादीला सांगितले.

फिर्यादी यांनी त्यासाठी होकार दिला. त्यानंतर पी. के. एंटरप्रायझेस, शिलाँग, मेघालय यांच्याकडून खनिज पदार्थ विकत घ्यायचा आहे. आपण आमच्या कंपनीतर्फे पी. के. एंटरप्रायझेस या कंपनीशी व्यवहार पूर्ण करून घेण्यासाठी मध्यस्थीचे काम करा, असे आरोपीने सांगितले. आरोपींनी बँक खात्यावर २७ लाख ९९ हजार ६३६ रुपये देण्यास सांगून फिर्यादीची फसवणूक केली.

loading image
go to top