Pune : तांत्रिक बिघाडामुळे फुरसुंगीत रोहित्राला आग

फुरसुंगीत महावितरणच्या रोहित्राला फुरसुंगीत आग लागल्याने काही भागात विदूत पुरवठा खंडीत झाला.
Electricity
Electricitysakal

फुरसुंगी : महावितरणच्या रोहित्राला फुरसुंगीत आग लागल्याने काही भागात विदूत पुरवठा खंडीत झाला.त्यामुळे नागरिकांकडून यावर कायमस्वरूपीचा तोडगा काढण्याची मागणी होत आहे.गजानन महाराज मंदिराकडून फुरसुंगी गावात जाणाऱ्या मार्गावर ही घटना गुरुवारी घडली.

येथील रोहित्रामध्ये तांत्रिक बिघाडामुळे मोठा स्पोट होऊन आग लागली.रोहित्र रस्त्यापासून बाजूला असल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.असे येथील रहिवाशी संतोष लोणकर यांनी सांगितले.मात्र या भागात महावीतरणच्या रोजच तांत्रिक अडचणी निर्माण होऊन विदूत पुरवठा खंडित होतो.येथे केवळ दुरुस्तीची कामे केली जात आहेत.

यावर कायम स्वरूपाचा मार्ग काढण्यास महावितरण असमर्थ ठरत आहेत,टाळाटाळ करत आहेत की या भागातले प्रश्न मार्गी लावायचेच नाहीत हेच समजत नाही.प्रत्येक वेळेस निधी नसल्याचे कारण समोर येते असे येथील रहिवाशी संजय कटके यांनी सांगितले.यासंदर्भात महावितरणचे अभियंता रवींद्र मोसलगी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही.त्यामुळे यामागचे नेमके

कारण समजू शकले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com