
पुणे : ‘‘कोणत्या मंडळाने किती वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हावे, हा ज्यांच्या त्याचा प्रश्न आहे. मात्र, अनंत चतुर्दशीच्या दिवशी आम्ही सकाळी सात वाजता लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकातून विसर्जनासाठी मार्गस्थ होणार,’’ असे शहरातील साठ गणेशोत्सव मंडळांनी गुरुवारी ठामपणे सांगितले. वर्षांनुवर्षे मानाच्या गणपतींमुळे विसर्जन मिरवणुकीत विलंब होत आहे. त्यामुळे सर्वांचेच हाल होतात, हे लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.