
मार्केट यार्ड : शहरातील बाजारपेठांमध्ये हार, पूजासामग्री आणि सजावटीच्या फुलांच्या खरेदीसाठी शहर व उपनगरांमध्ये मोठी गर्दी झाली. गणरायाच्या पूजेसाठी हार लागणार असल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात फुलांना जास्त मागणी होती. त्यामुळे फुलांच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रसादासाठी फळांचा वापर होत असल्याने फळांनाही चांगली मागणी होती.