
पुणे : ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका’, ‘छत्रपती संभाजी महाराज- इतिहासाचा तेजस्वी सूर्य...’, ‘पावनखिंडीतील थरार...’, ‘चापेकर बंधूंनी रॅंडचा वध करण्याचा केलेला पराक्रम’ या जिवंत देखाव्यांसह ‘हनुमान आणि कुंभकर्णामधील युद्ध’, ‘संत ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत आणि दिलेला उपदेश’ असे पौराणिक देखावे गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. शनिवार, सदाशिव, नारायण आणि शुक्रवार पेठेतील मंडळांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक, ऐतिहासिक आणि पौराणिक देखावे सादर केले आहेत. बहुतांश मंडळांनी जिवंत देखावे सादर करण्यावर भर दिला आहे, हे यंदाचे वैशिष्ट्य आहे.