esakal | पुणे : गणेश मंडळांच्या माध्यमातून मतदार जागृती होणार
sakal

बोलून बातमी शोधा

Voter

पुणे : गणेश मंडळांच्या माध्यमातून मतदार जागृती होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या वतीने ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी या स्पर्धेबाबत जिल्हा स्तरावरील नियोजन केले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना देखाव्यांच्या आयोजनावर असलेली बंधने लक्षात घेऊन घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. घरोघरी छोटेखानी देखावे साकारले जातात. अशा देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला जातो. मताधिकार हा १८ वर्षावरील नागरिकांना कायदेशीर अधिकार आहे.

हेही वाचा: सिंधुदुर्ग : आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे. हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये, नातेवाईकांमध्ये मतदार नाव नोंदणी, वगळणी यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच, मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पड़ता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर घरगुती गणेशोत्सव सजावटीतूनही जागृती करता येऊ शकते. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर स्पर्धेची नियमावली देण्यात आली आहे.

हेही वाचा: आयटी धोरणासाठी संकल्पना द्या : राज्यमंत्री सतेज पाटील

या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, तसेच मतदार नाव नोंदणी आणि वगळणी यांसाठी प्रसार-प्रचार केला जाणार आहे. गणेश मंडळाच्या मंडपात आणि ऑनलाइन माध्यमांद्वारेही जागृती केली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी अधिकाधिक नागरिकांना या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

नवमतदारांसाठी नोंदणीस प्रारंभ

एक जानेवारी २०२२ या अर्हतादिनावर आधारित मतदार याद्यांच्या पुनरीक्षणांचा कार्यक्रम एक नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होत आहे. यामध्ये एक जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांच्या नोंदणीसाठी अर्ज स्वीकारले जातील.

loading image
go to top