
Pune Ganesh Visarjan 2025
esakal
पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीने यंदा मागील वर्षीचा २८ तासांचा रेकॉर्ड मोडला आहे. अनंत चतुर्दशीला सकाळी सुरू झालेली ही मिरवणूक तब्बल २९ तासांहून अधिक काळ लोटूनही अद्याप सुरूच आहे. मिरवणुकीच्या संथ गतीमुळे आणि मंडळांच्या अतिउत्साहामुळे पुणे पोलिसांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून, सर्वसामान्य पुणेकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.