
कोल्हापूरच्या नांदणी येथील माधुरी हत्तीच्या धार्मिक मिरवणुकीतील सहभागाने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पेटा आणि वनताराच्या याचिकेमुळे तिला वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात हलवण्यात आले, यामुळे संपूर्ण राज्यात संताप उसळला. तरीही, माधुरीला परत आणण्यासाठी अनेक आंदोलने झाली. अखेर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र पेटाच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण होतात.