

Same rules for all festivals, warns Pune Police Commissioner.
पुणे : पुणे शहरातील सर्व सण-उत्सवांसाठी एकसारखेच नियम लागू केले जातील. उत्सवात डीजेला चार बेस आणि चार टॉपचा नियम सर्वांना पाळावा लागेल. त्यापेक्षा अधिक ध्वनियंत्रणा वापरल्यास ध्वनीची निर्धारित मर्यादा पाळणे शक्य होणार नाही. शहरातील ९९ टक्के गणेश मंडळे आणि कार्यकर्ते पोलिसांची भूमिका मान्य करतात; मात्र काही जण स्वतंत्र भूमिका मांडतात. नियमांपेक्षा वेगळी भूमिका घेतल्यास गुन्हे दाखल होऊन न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. पोलिस आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते एकत्रितपणे काम केल्यास दहीहंडी आणि गणेशोत्सव अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडता येईल, असे आवाहनही त्यांनी केले.