पुण्यात गणेशोत्सवात ५ दिवस 'ड्राय डे'; कोणत्या भागात मद्यविक्री कधी बंद? जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

Pune Dry Day गणेशोत्सवानिमित्त पुण्यात गणेश चतुर्थी, पाचवा, सातवा दिवस, अनंत चतुर्दशी आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत ड्राय डे असणार आहे. याशिवाय काही भागात गणेशोत्सवात सर्व दिवस ड्राय डे असेल.
Pune Dry Day

Pune Dry Day

Esakal

Updated on

पुणे शहरात गणेशोत्सवानिमित्त कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने १४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत ड्राय डे असणार आहे. काही भागात १४ ते २५ सप्टेंबर कालावधीत पूर्णपणे ड्राय डे असेल तर काही भागात गणेश चतुर्थी, पाचवा आणि सातवा दिवस, अनंत चतुर्दशी ते दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com