esakal | पुणे : गणेश उत्सव मंडळांना हवी स्थिर वादनाची परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

Dhol Tasha

पुणे : गणेश उत्सव मंडळांना हवी स्थिर वादनाची परवानगी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - गणेश उत्सव मंडळाच्या (Ganesh Utsav Mandal) समोर ढोल पथकांना (Dhol Pathak) स्थिर वादन करण्याकरिता परवानगी (Permission) द्यावी, अशी मागणी शहरातील गणेश मंडळांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन मंडळांनी आयुक्तांना दिले असून पाच वादकांना वादन करण्याची परवानगी द्यावी, असे त्यात नमूद केले आहे.

सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सव कोरोनाच्या सावटाखाली होत आहे. त्यामुळे यंदाही देखावे तयार न करता गणेशोत्सव साध्या पद्धतीने करावा. भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून द्यावी. मंडळांनी आरोग्य सेतू ॲप वापरण्यास प्राधान्य देऊन सामाजिक उपक्रम राबवितानाही योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केली आहे. याबरोबरच राज्य सरकार, पुणे महापालिकेच्या नियमांचे पालन करतानाच पुणे पोलिसांनी गणेशोत्सवासाठी आचारसंहिता तयार केली असून त्याचे पालन करण्याचेही नागरीकांना आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर मंडळांच्या काही मागण्यांचे निवेदन आयुक्तांना दिले. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संजय बालगुडे, वीर हनुमान मित्र मंडळाचे दत्ता सागरे, गुरुदत्त मंडळाचे उदय महाले, पुणे बढाई समाज ट्रस्टचे शैलेश बढाई, सहकार तरुण मंडळाचे भाऊ करपे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे महेश सूर्यवंशी, गणेश पेठ पांगुळ आळी सार्वजनिक गणेश मंडळ ट्रस्टचे विलास ढमाले आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: भारतात पर्सनल एआय असिस्टंट एसयूव्ही "ऍस्टर'

मंडळांनी केलेल्या मागण्या

  • उच्च न्यायालयाने निर्देश केल्याप्रमाणे गणेश मंडळांना त्यांच्या परिसरात जाहिरात कमान टाकण्यास परवानगी द्यावी

  • गणेश उत्सव मंडळासमोर ढोल पथकांतील पाच जणांना स्थिर वादन करण्याकरिता परवानगी मिळावी

  • २०१६ साली मान्य नियमाप्रमाणे रनिंग मंडप परवानगी द्यावी

गणेशमूर्ती विक्रीसाठी ५९१ जागा निश्‍चित

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना महापालिकेने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गणेशमूर्ती विक्रीच्या स्टॉलसाठी नियोजन केले आहे. शहराच्या ३९ भागात ५९१ जागा निश्‍चीत केल्या आहेत. प्रत्येक स्टॉलसाठी ९ हजार रुपये भाडे आकारले जाणार आहे. रस्त्‍यावर किंवा पादचारी मार्गावर स्टॉल लावण्यास बंदी आहे. मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा: पुणे : मिळकत वाटप नियमावलीत होणार सुधारणा

गणेशोत्सवाच्या पूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांमध्ये रस्त्याच्या कडेला स्टॉल लावून गणेश मूर्तींची विक्री केली जाते. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. कोरोनामुळे एकाच ठिकाणी गर्दी झाल्यास त्यातून संसर्गाचा धोका वाढू शकतो, त्यामुळे महापालिकेने मूर्ती विक्रीच्या स्टॉलसाठी नियोजन केले आहे. शहरातील ३९ भागात ५९१ स्टॉलसाठी जागा आहे, प्रत्येक स्टॉलहा १५ बाय १० इतक्या मापाचा असणार आहे. ज्यांना स्टॉल लावायचे आहेत, त्यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयास अर्ज करावा. महापालिकेतर्फे केवळ जागा उपलब्ध करून दिली जाणार असून, त्याठिकाणी मांडव टाकणे, सॅनिटायझरची व्यवस्था करणे यासह सुरक्षेची जबाबदारी व्यावसायिकांवर असणार आहे. याची अधिक माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे मुठे यांनी सांगितले.

loading image
go to top