Pune : बनावट जामिनदारांच्या टोळीला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime
पुणे : बनावट जामिनदारांच्या टोळीला अटक

पुणे : बनावट जामिनदारांच्या टोळीला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना बनावट कागदपत्रांव्दारे जामीन मिळवून देणाऱ्या टोळीला गु्न्हे शाखेने अटक केली आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालय आणि खडकी न्यायालयाच्या आवारात गुरुवारी (ता. 11) कारवाई करून टोळीतील सदस्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात एकूण दहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून बनावट शिधापत्रिका, आधारकार्ड, सातबारा उतारे, छायाचित्र, रबरी शिक्के असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोपाळ कुंडलिक कांगणे (वय ३३, रा. मोरवाडी, पिंपरी ), रवी राजू वाघमारे (वय २९), हसन हाजी शेख (वय २५), सागर अनंत काटे (वय २५), सोनू हरि शिंदे (वय २०), सलीम सायधन शेख (वय २७, चौघे रा. राजीव गांधीनगर, पिंपळे गुरव), इनकर सुंदर कांबळे (वय ३८, रा. आनंदनगर, चिंचवड), रोहित विद्यासागर पुटगे (वय २४, रा. पिंपळे गुरव), किरण दादाभाऊ सूर्यवंशी (वय २७, रा. आदर्शनगर, पिंपळे गुरव) आणि मंगेश महादेव लोंढे (वय ३१, रा. पिंपळे सौदागर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा: Pune : जांभूळवाडी कोळेवाडीतील पथदिवे बंद ; स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा

शिवाजीनगर, खडकी न्यायालयाच्या आवारात बनावट कागदपत्रांच्या आधारे गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळवून देणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हे शाखेतील उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकांनी शिवाजीनगर, खडकी न्यायालयात पाळत ठेवली होती. शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून सातजणांना तसेच खडकी न्यायालायाच्या आवारातून तीनजणांना अशा दहाजणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून जामीन मिळवून देण्यासाठी लागणारी बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली. पोलिस निरीक्षक विनायक जाधव, सहायक निरीक्षक विवेक पाडवी, उपनिरीक्षक विकास जाधव, खडके, शेडगे, संजय गायकवाड, गुंगा जगताप, पोलिस अंमलदार मनोज साळुंके, संदीप जाधव, राहुुल जोशी, मारूती पारधी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, प्रवीण उत्तेकर, विश्वनाथ घोणे, गणेश लाेखंडे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश माेहित यांनी ही कारवाई केली.

loading image
go to top