Pune : जांभूळवाडी कोळेवाडीतील पथदिवे बंद ; स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 streetlight

Pune : जांभूळवाडी कोळेवाडीतील पथदिवे बंद ; स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा

आंबेगाव बुद्रुक : जांभूळवाडी कोळेवाडी ग्रामपंचायत महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून येथील असणाऱ्या पथदिव्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे महापालिकेकडून दुर्लक्ष होत असून ते नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. ऐन दिवाळीतही या गावातील अनेक पथदिवे बंद होते. त्यामुळे महापालिकेतील पाहिली दिवाळी ही अंधारात गेली आहे.

महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर ग्रामपंचायतीपेक्षा सक्षम सुविधा गावांना मिळतील या नागरिकांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत.उलट ग्रामपंचायतीकडून वळोवेळी पाठदिव्यांची देखभाल दुरूस्ती होत होती. जांभूळवाडी व कोळेवाडीतील काही ठिकाणी व वस्ती भागात केवळ पथदिवे उभारण्यात आले आहेत मात्र त्यावर अद्यापही एलईडी दिवे बसवण्यात आलेले नाहीत. महापिलकेकडून दिरंगाई केली जात आहे. एका बाजूला महापालिकेने कर संकलनाचा सपाटा लावला आहे. मात्र मुलभूत सुविधांना पालिकेकडून बगल दिली जाते आहे.

हेही वाचा: राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; 'लालपरी'चा मार्ग होणार का खुला?

जांभूळवाडी ते विरालयम मंदीर, दरीपूल परिसर,कोळेवाडी गावातील मुख्य रस्ता हे वर्दळीचे व नागरीवस्तीचे भाग आहेत. या भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांना रात्री अंधारातून जाताना अनेकदा धोकादायक स्थितीचा सामाना करावा लागत आहे. शिवाय बाह्यवळण मार्गावरील अभिनव महाविद्यालय ते दत्तनगर येथील राजमाता भुयारी मार्गातील दुभाजकाती पथदिवे बंद ठेवून महापालिकेने या मार्गाला अपघाती बनवले आहे. भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडीचे उपाध्यक्ष

नितीन जांभळे पाटील यांनी धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाला दोन महिन्यापुर्वी पथदिवे देखभालीसाठी पत्र दिले होते मात्र त्यालाही केराची टोपली दाखवण्यात आली.असल्याचे जांभळेपाटील यांनी सांगितले.आमची ग्रामपंचायतच बरी होती.त्यावेळी किमान देखभाल दुरूस्तीची कामे वेळेत होत होती. अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. तर महापालिकेने मात्र गावे समाविष्ट करून नागरिकांची घोर निराशा केली आहे. पालिकेने तत्काळ पथदिवे बसवले नाहीत तर आयुक्त कार्यालयासमोरच स्थानिक नागरिक मेणबत्ती आंदोलन करतील असा इशारा जांभळे यांनी दिला आहे.

loading image
go to top