
Gangster Nilesh Ghaiwal’s family missing as Pune Police investigates his fake passport and Switzerland escape.
sakal
Summary
बनावट पत्ता देऊन बनावट पासपोर्ट मिळवल्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
घायवळवर याआधीही बनावट नंबर प्लेट आणि मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
पासपोर्ट प्रकरणात माजी पोलिस निरीक्षक विकास वाघ यांच्या भूमिकेची चौकशी होणार आहे.
Nilesh Ghaiwal Pune Gangster : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारानंतर परदेशात पळाला. निलेश घायवळ सध्या स्विझरलँडमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. त्याच्या कुटुंबाची बॅंक खाती गोठवणण्यात आली आहे. पुणे पोलिस निलेश घायवळच्या कुटुंबाची चौकशी करण्यासाठी आहिल्यानगरमध्ये पोहोचले असून त्याचे कुटुंबीय गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. निलेश घायवळला पासपोर्ट जारी करण्यास मदत करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचाही कारनामा समोर आला आहे.