वर्षभरापूर्वी जिथं मेहुण्याला संपवलं, तिथंच लेकाची हत्या; बाप तुरुंगात, पुण्यात टोळीयुद्धाचा भडका

Pune Gangwar : पुण्यात नाना पेठेत शुक्रवारी रात्री गोळ्या घालून आयुष उर्फ गोविंदा गणेश कोमकर याची हत्या केली. गोविंदा हा वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा होता.
Nana Peth Turns Crime Scene as Gang War Claims Another Life

Nana Peth Turns Crime Scene as Gang War Claims Another Life

Esakal

Updated on

ऐन गणेशोत्सवात पुण्यात टोळीयुद्धाचा भडका उडाला. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची वर्षभरापूर्वी हत्या झाली होती. या हत्येचा बदला म्हणून त्यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीच्या मुलाची हत्या करण्यात आलीय. पुण्यात नाना पेठेत शुक्रवारी रात्री गोळ्या घालून आयुष उर्फ गोविंदा गणेश कोमकर याची हत्या केली. रात्री पावणे आठ वाजता गोविंदा क्लासमधून परत आला तेव्हा त्याच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. पुणे गुन्हे शाखेच्या उपायुक्तांनी या घटनेची माहिती दिलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com