esakal | पुण्यातील चित्रवेड्या अवलियाने साकारली श्रींची ८०० चित्रे
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Papal

पुण्यातील चित्रवेड्या अवलियाने साकारली श्रींची ८०० चित्रे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट - एखाद्या विषयामध्ये जीव ओतून अभ्यास करत वेडी माणसं इतिहास घडवितात. शालेय जीवनामध्ये अनेकांच्या आवडीचा चित्रकला विषय असतो. त्यामध्ये काहींकडून सातत्य टिकवत तो कायम ठेवून त्यामध्ये वेगळेपण दाखवतात. त्यातीलच एका अवलियाने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ७००-८०० श्रींची चित्रे पेन्शिलच्या माध्यमातून साकारली आहेत. घरामध्ये श्रींची प्रतिष्ठापना केली आहे, अमित यशवंतराव पापळ यांनी...

पापळ पुण्यातील विष्णूपुरा वाडा (लक्ष्मी रोड, बुधवार पेठ) येथे राहतात. नू. म. वि. प्रशाला आणि भारती विद्यापीठ (फाउंडेशन डिप्लोमा) येथे शिक्षण झाले. त्यांचा मागिल चार पिढ्यांपासून मंडई येथे पापळ इंडस्ट्रीज नावाने फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. मात्र, त्यांच्यातील चित्रकलेचे वेड त्यांना स्वस्त बसू देत नाही, त्यामुळे आजही श्रींचे चित्र साकारण्यात ते मोठे समाधान मानत आहेत.

हेही वाचा: ‘सोमेश्‍वर’ची लढत‘ब्रेक के बाद’ सुरू

लहानपणी लग्नपत्रिका घरी यायच्या, त्यावर वेगवगळ्या प्रकारचे गणपतीचे छापील चित्र असायचे, ते पाहून कुतुहल वाटायचे. शालेय जीवनामध्ये ऑफ़ तासाला त्या पत्रिकेवरील श्रींचे चित्र पेनाने वहिच्या मागच्या पानावर काढायचो, त्यामुळे वह्या मागच्या बाजूने भरू लागल्या. त्यानंतर हळूहळू ड्रॉईंग पेपरवर श्रींचे चित्र काढण्याचा सराव सुरु झाला. त्यानंतर लग्नपत्रिकेवर छापण्यासाठी गणपतीचे चित्र काढून देणे, काही मंडळांसाठी अहवाल, सजावटीची कामे करू लागलो. त्यातूनच वेगवेगळ्या प्रकारच्या कामाचा अनुभव मिळत गेला. त्यातूनच गणपतीचे चित्र काढण्याचा छंद मनाला जडला, तो आजपर्यंत टिकून आले.

आजमितीला पेन आणि फोटो कलर इंक वापरुन केलेले सुमारे ७००-८०० गणपती संग्रही आहेत. काही गणपती भारतातील वेगवेगळ्या भाषांमधील मुळाक्षरांमधून साकारले आहेत. काही भिंगांमधून बघावे लागतील, असे आहेत. गणपतीचे चित्र काढताना पेन्शिल आणि खोडरबरचा वापर केला नाही. त्यासाठी लेदर टेक्सचर पेपरवर ब्लँक इंक पेनने गणपती चितारुन त्यात फोटो कलर इंकचा वापरून बरीचशी चित्रं काढली आहेत.

हेही वाचा: सुप्रिया सुळे यांनी घेतली आयपीएस वैभव निंबाळकरांची भेट

दरम्यानच्या कालावधीत राजकीय व्यंगचित्राकडे वळलो. त्यातूनच गणपतीच्या नजरेतून सामाजिक व्यथा आणि चालू घडामोडीँवर व्यंगचित्रामधून समजप्रबोधनाची कला अवगत झाली. चित्रकलेची पार्श्वभूमी नाही, चित्रकलेचे वेगळे शिक्षण नाही, तरीसुद्धा फक्त गणपती मंडळांच्या कामातून कला अवगत झाली हे सांगताना अभिमान वाटत आहे. आत्तापर्यंत बऱ्याच राजकीय पक्ष, नेते आणि निवडणुकांबरोबर नामांकीत कंपन्यांच्या व्यवसायिक जाहिरातीकरिता नानाविध चित्रे रेखाटली आहेत. गणपती मंडळांमधील छोट्या मुलां-मुलींमधील गरजू आणि होतकरू कलाकारांनाही कलेचे शिक्षण देण्याचे काम सुरू आहे. गणपतीने दिलेली ही आशिर्वादरुपी कला पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे.

loading image
go to top