Ganpati Visarjan 2023 : आकर्षक सजावटीतील रथामधून मिरवणूक काढत भोसरीकरांचा श्रीगणेशाला निरोप

छत्रपती श्री शिवाजी तरुण मित्र मंडळाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज कालीन विविध शस्त्रासह मैदानी खेळ आयोजित
Ganpati Visarjan 2023
Ganpati Visarjan 2023sakal

भोसरी : गणेशाच्या विसर्जनासाठी आकर्षक सजवलेले रथ, फुलांची आरास, ढोल ताशाचा गजर डिजेचा घणघणाट, थिरकणारी तरुणाई, विद्युत रोषणाईचा झगमगाट, मर्दानी खेळ, फटाक्यांची आतषबाजी, रांगोळ्यांच्या पायघड्या, आणि वरुणराजाची बरसात, आशा वातावरणात भोसरीकरांनी गणेशाला निरोप दिला.

भोसरीतील विसर्जन मिरवणूका गावठाणातील बापूजी बुवा चौक आणि लांडेवाडी चौक अशा दोन ठिकाणाहून सुरू झाल्या. बापूजीबुवा चौकापासून मिरवणूक भैरवनाथ मंदिर, पीएमटी चौक ते विसर्जन घाट तर लांडेवाडी चौकातून अग्निशमन केंद्र,

पीसीएमटी चौक, पीएमटी चौक, विसर्जन घाट अशा मार्गाने विसर्जन मिरवणूका निघाल्या. पीएमटी चौकात महापालिकेच्या इ क्षेत्रीय कार्यालयाद्वारे सर्व गणेश मंडळांचा श्रीफळ व हार देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले. काँग्रेस पक्षाद्वारेही गणेश मंडळांचा सत्कार करण्यात आला.

विसर्जन मिरवणुकीत लांडगे लिंबाची तालीम मंडळाने श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या भव्य मूर्तींद्वारे रामायणाला उजाळा दिला. पठारे-लांडगे तालीम व्यायाम मंडळाने आकर्षक प्राचीन महाल तयार केला होता.

श्रीराम मित्र मंडळाने कैलास पर्वतावरील शंकराची ध्यान साधना रथावरून ‘श्री’ची विसर्जन मिरवणूक काढली. खंडोबामाळमधील खंडोबा मित्र मंडळाने राक्षस वधाचा भव्य देखावा सादर केला होता. लांडेवाडीतील नव महाराष्ट्र तरुण मंडळाने आकर्षक फुलांच्या गरूड महालात गणपतीची मिरवणूक काढली.

Ganpati Visarjan 2023
Bhosari News : बेशिस्त वाहनचालक; पोलिसही ‘गायब’

आळंदी रस्त्यावरील श्री गणेश तरुण मंडळाने आकर्षक रोषणाईतील रथातून गणेशाची मिरवणूक काढली. नरवीर तानाजी मंडळाने डिजीटल रथातून श्रीगेणेशाची मिरवणूक काढली. लोंढे तालिम मित्र मंडळाने महाकाल मंदिराचा रथ तयार केला होता. छत्रपती श्री शिवाजी तरुण मित्र मंडळाने तयार केलेली सिंहासनावरील आसनस्थ छत्रपती शिवाजी महाराज आणि सैन्यांसह राजमुद्रा उठून दिसत होती.

समस्त गव्हाणे तालीम मंडळाने संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची विठ्ठलासमोरील भक्ती रथ सादर केला. समस्त मधले फुगे मित्र मंडळाचा आकर्षक विद्युत रोषणाईतील महाल मिरवणूकीत सहभागी झाला होता. दिघी रस्त्यावरील आदर्श मित्र मंडळाने श्री तिरुपती बालाजीचा भव्य रथ तयार केला होता.

Ganpati Visarjan 2023
Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीला जाणाऱ्या ४ भाविकांना टेम्पोने उडवलं

विनर्स मित्र मंडळाचा विद्युत रथ होता. कै. दामूशेठ गव्हाणे यांचा महाकाल रथ मिरवणूकीत सहभागी झाला होता. नवज्योत मित्र मंडळाचा भगवान शंकर रथ आकर्षक होता. धर्मवीर संभाजी मित्र मंडळाने आकर्षक फुलांमध्ये तयार केलेली बैलगाडी लक्ष वेधक ठरली. कै. भगवानशेठ गव्हाणे मित्र मंडळ,

भोजराज मित्र मंडळ, शिवराजे मित्र मंडळ, जय बजरंग तरुण मंडळ, आझाद मित्र मंडळ, भोजेश्वर मित्र मंडळ, उदय मित्र मंडळ, विनर्स तरुण मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, कानिफनाथ मित्र मंडळ आदी मंडळांनीही आकर्षक सजावटीतील रथातून गणेशाची मिरवणूक काढली. इंदूबंद सोसायटीमध्ये टाळ-मृदुंगाच्या गजरात पारंपारिक लेझीम खेळत गणरायाला निरोप दिला.

चित्त थरारत मर्दानी खेळ

छत्रपती श्री शिवाजी तरुण मित्र मंडळाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज कालीन विविध शस्त्रासह मैदानी खेळ आयोजित केले होते. यामध्ये तलवारबाजी, लाठीकाठी, कुऱ्हाड, दांडपट्टा, खंजीर, काठी बंदीश आदी खेळांचे मुला-मुलींनी सादर केलेली प्रात्यक्षिके रोमहर्षक ठरली. दांडपट्ट्यारे बोटाखालील लिंबू चिरणे, कुऱ्हाडीने अंगावरील काकडी चिरणे आणि साखळी गोळ्याने अंगावरील नारळ फोडणे श्वास रोखणारे होते.

गुलाल भंडार हद्दपार

विसर्जन मिरवणूकीत कोणत्याच मंडळांनी गुलाल आणि भंडाऱ्याचा उपयोग केला नाही. काही मंडळांनी फुलांच्या पाकळ्या तर काहींनी रंगीबेरंगी कागदांच्या असंख्य तुकड्यांची उधळण यंत्राद्वारे गणेशांवर केली. काही मंडळांनी गणेश रथांची रांगोळीच्या पायघड्यात मिरवणूक काढली.

असे झाले गणेश विसर्जन

  • भोसरीतील मुख्य विसर्जन मिरवणूकीस संध्याकाळी सहा वाजता सुरुवात झाली.

  • संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत १७ गणेश मंडळांचे विसर्जन

  • रात्री बारानंतर २० गणेश मंडळांचे विसर्जन.

  • रात्री बारा वाजता भोसरी पोलिसांनी ढोल-ताशा पथकासह डीजे बंद केल्याने शांततेत व जलद गणेश विसर्जन झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com