

PUNE GANESH VISARJAN 2026: WHERE TO PARK YOUR VEHICLE? CHECK 26 PARKING LOCATIONS PROVIDED BY PMC
sakal
PUNE GANESH VISARJAN TRAFFIC AND PARKING ARRANGEMENTS: ढोल-ताशांचा गजर, बाप्पाच्या जयघोषाने दुमदुमणारे रस्ते आणि मिरवणुकीची आतुरता… गणेश विसर्जनासाठी पुणे पुन्हा एकदा सज्ज झालं आहे. मात्र मिरवणूक पाहण्यासाठी मध्यवर्ती भागात जाणार असाल, तर एक महत्त्वाची गोष्ट आधीच ठरवून ठेवा, ती म्हणजे गाडी नेमकी कुठे पार्क करायची? कारण गर्दीच्या काळात रस्त्याच्या कडेला वाहन लावणं महागात पडू शकतं. त्यामुळे पुणे वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेली 26 पार्किंग ठिकाणं आधीच लक्षात ठेवणं फायदेशीर ठरणार आहे.