
पुणे : पुणे जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर नेण्यासाठी आयोजित केलेल्या पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेचा मार्ग अंतिम केला आहे. या मार्गावरील रस्त्यांची कामे करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ला दोनशे कोटींचा, तर जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ३५ कोटींचा निधी देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली.