...त्या मुलीवर एकूण १३ जणांनी केला अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

...त्या मुलीवर एकूण १३ जणांनी केला अत्याचार

पुणे : मित्राला भेटण्यासाठी मुंबई येथे निघालेल्या १४ वर्षीय मुलीचे मदतीच्या बहाण्याने रिक्षातून अपहरण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार प्रकरणात वानवडी पोलिसांनी आणखी सहा जणांना अटक केली आहे. त्यातील पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. या मुलीवर एकूण १३ जणांनी निर्जनस्थळी, जंगलात, लॉज आणि रेल्वे कार्यालय अशा ठिकाणी नेवून तिच्यावर बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिराअली ऊर्फ मीरा अजीज शेख (वय २६, मंगळवार पेठ), शाहुजर ऊर्फ सिराज साहेबलाल छप्परबंद (वय २८, रा. कोंढवा), समीर मेहबूब शेख (वय १९, रा. कोंढवा खुर्द), फिरोज ऊर्फ शाहरुख साहेबलाल शेख (वय २२, रा. कोंढवा), मेहबूब ऊर्फ गौस सत्तार शेख (वय २३, रा. कोंढवा खुर्द), महम्मद ऊर्फ गोलु मोज्जाम आलम (वय १९, रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. महम्मद ऊर्फ गोलु मोज्जाम आलम हा संबंधित मुलीचा मित्र आहे. त्याने फूस लावून मुलीला त्याच्याकडे बोलावले म्हणून त्याला देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सोमवारी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: परंपरेची नग्नता; पावसासाठी अल्पवयीन मुलीचा छळ!

आरोपींनी मदतीच्या बहाण्याने तिचे अपहरण केले त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. आरोपींमध्ये रेल्वेचे दोन कर्मचारी, रिक्षा चालक व इतरांचा सहभाग आहे. पहिल्या दिवशी चौघांनी तर दुसऱ्या दिवसी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले होते. मात्र आता एकूण १३ नावे स्पष्ट झाली आहेत. पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या तपासादरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

मुलीला वानवडी पोलिसांनी चंडीगड येथून ताब्यात घेतल्यानंतर तिने ही सर्व माहिती पोलिसांना दिली. अटक केलेल्या सहा जणांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींनी यापूर्वी देखील असे काही प्रकार केले आहेत का? त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का? यासह गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्यांना एकूण १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. त्यानुसार न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी आरोपींस १० दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. वानवडी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सुधा चौधरी या गुन्ह्याचा तपास करीत आहेत

Web Title: Pune Girl Tortured Total 13 People

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newscrime