सायकलवरून पुणे ते गोवा 25 तासांत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

वाघोली - वाघोली येथील डॉ. राहुल शिंदे, डॉ. विनोद शेलार, राजाराम शिंदे व बीपीन उंद्रे या चार तरुणांनी सलग सायकल चालवत पुणे ते गोवा हे 643 किलोमीटरचे अंतर 25 तासांत पूर्ण करीत पहिल्या दहा क्रमांकात स्थान मिळविले. 

वाघोली - वाघोली येथील डॉ. राहुल शिंदे, डॉ. विनोद शेलार, राजाराम शिंदे व बीपीन उंद्रे या चार तरुणांनी सलग सायकल चालवत पुणे ते गोवा हे 643 किलोमीटरचे अंतर 25 तासांत पूर्ण करीत पहिल्या दहा क्रमांकात स्थान मिळविले. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

"इन्स्पायर इंडिया' या संस्थेच्या वतीने डेक्कन क्‍लिफहॅंगर अल्ट्रा सायकल रेस दरवर्षी आयोजित केली जाते. या वर्षी या रेसमध्ये 200 जणांनी सहभाग घेतला होता. यामध्ये या चार तरुणांच्या टीमचा समावेश होता. "फुरिअस -4' असे नाव या टीमला नाव देण्यात आले होते. पुण्यातील भूगाव येथील फॉरेस्ट ट्रेल्सपासून सकाळी आठ वाजता या रेसला सुरवात झाली. कात्रज घाट, खंबाटकी घाट, पसरणी घाट असे विविध घाट, नागमोडणी रस्ते, वळणे, रात्रीचा सलग प्रवास असे अनेक अडथळे पार करीत ही टीम गोव्यातील बोगमालो बीचवर दुसऱ्या दिवशी नऊ वाजता पोचली. 31 तासांची मुदत असताना 25 तासांत हे अंतर पार करून त्यांनी पहिल्या 10 क्रमांकांत स्थान मिळविले. त्यांच्या मदतीला चार जणांची डॉक्‍टरांची मदतनीस टीम होती. यामध्ये डॉ. शिवाजी नरवडे, डॉ. शंकर वावरे, डॉ. संजय शिंदे आणि डॉ. राजेंद्र खेत्रे यांचा समावेश होता. 

डेक्कन क्‍लिफहॅंगर ही एक आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त अल्ट्रा सायकल रेस असून यंदाचे हे आयोजनाचे सहावे वर्ष होते. सोलो पद्धतीने ठराविक वेळेत रेस पूर्ण केल्यास स्पर्धक जगातील सर्वांत कठीण समजल्या जाणाऱ्या रेस अक्रॉस अमेरिका या स्पर्धेस पात्र ठरतो. 

दररोजचा सराव, डॉक्‍टर मित्रांचे सहकार्य, कुटुंबाची साथ व इन्स्पायर इंडिया संस्थेचे इन्स्पिरेशन यामुळे ही रेस 25 तासांत पूर्ण करू शकलो. यापुढेही अशा रेसमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. 
- डॉ. राहुल शिंदे, सहभागी सदस्य 

Web Title: Pune to Goa on a bicycle in 25 hours